Author: dainiksnehprakash

कायद्यात काही तरतुदी करून बदल करणार -ना कदम संगमनेर \प्रतिनिधी संगमनेरमध्ये अवैध कत्तलखाने सुरू पोलीस अधिकाऱ्यांकडून एका आरोपी वर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का तसेच अवैध कत्तलखाने सुरू असलेल्या पोलीस अधिकार्याना जबाबदार धरून कारवाई होणार का असा सवाल आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेमध्ये उपस्थित करत पुन्हा एकदा गृहमंत्र्यांचे या महत्त्वा च्या प्रश्नाकडे लक्ष वेधले असता यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, तसेच कडक कारवाईसाठी कायद्यात काही तरतुदी करून बदल केला जाईल, संगमनेर शहरातील अवैधरित्या सुरू असणाऱ्या कत्तलखान्याबाबत संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संगमनेर शहर पोलीस निरीक्षक यांच्या कडून राज्याच्या मुख्यमंत्र्याना खोटी…

Read More

अहिल्यानगर, दि.१७- ग्राहकांच्या समस्यांच्या सोडवणूकीसाठी स्थापन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या कामकाजाचा आढावा अपर जिल्ल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत घेतला. बैठकीस उपजिल्हाधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, सहायक पुरवठा अधिकारी एम.के. चौधरी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सो.ह इंगळे, वैधमापनशास्त्र विभागाचे उप नियंत्रक रमेश दराडे, उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी श्री हिंगे म्हणाले, ग्राहकांच्या समस्यांची परिषदेच्या माध्यमातून समन्वयातून सोडवणूक करण्यात यावी. वीजेशी तसेच स्थानिक सोयी-सुविधांशी निगडीत नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, त्यांची प्राधान्याने सोडवणूक करण्यात यावी. विद्युत विभागाने अखंडित वीज पुरवठा तसेच याबाबतची नागरिकांचे कुठलेही प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत,…

Read More

*स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडी*: *स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये मिरा भाईंदर मनपा देशात प्रथम* *राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान* माधुरी मिसाळ यांच्यासह २०००० ते ५०००० लोकसंख्येच्या गटात देवळाली प्रवरानगर नगरपालिकेने सुपर स्वच्छ लीगमध्ये स्थान मिळविल्याबद्दल नगरपालिका मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. नवी दिल्ली, 17 : स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले असून राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यंदाच्या सर्वेक्षणात मिरा भाईंदर महानगरपालिकेने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावत राज्याचा नावलौकिक वाढविला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते या राष्ट्रीय…

Read More

संगमनेर : महसूल विभागातील उत्कृष्ट कामाबद्दल परिचीत असलेले तलाठी प्रविण दाहाके यांचे हिवरगाव पावसा येथे स्वागत करण्यात आले.सजा हिवरगाव पावसा येथे नुकताच तलाठी प्रविण दाहाके यांनी पदभार स्वीकारला त्यांचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले.कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी कामगार तलाठी प्रविण दाहाके यांचा सत्कार करून स्वागत केले.तसेच सरपंच सुभाष गडाख यांच्या सह इतर ग्रामस्थांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी मंगल शुभेच्छा दिल्या. यापूर्वी त्यांनी नियुक्तीच्या गावांमध्ये शेतकरीभिमुख कामाचा ठसा उमटवला आहे. शेतकऱ्यांची अडवणूक न करता उलट कार्यालयात अधिकाधिक वेळ देणारे तलाठी अशी त्यांची ओळख आहे.याशिवाय मागील वर्षात शेती पंचनामे, कोविडकाळातील कामगिरी याबाबतीत उत्कृष्ट काम केले आहे.अशा कर्तव्यदक्ष कामगार…

Read More

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा* मुंबई – आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ असणार आहे. त्यामुळे हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी नुतनीकरण व विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा आज श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील विधानभवनातील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, अहिल्या नगरचे…

Read More

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आधीस्वीकृतीधारक पत्रकारांच्या एसटी बस प्रवासाच्या सवलतींच्या मुद्यावर गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दीपक भातुसे, खजिनदार विनोद यादव, कार्यकारिणीचे सदस्य प्रशांत बारसिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते. सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या, निमआराम व शिवशाही…

Read More

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे एकत्रित निवेदन सादर करून प्रकाश आण्णा चित्ते यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा, बनावट व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा ठपका लावत या गुन्ह्यातून त्यांचे नाव तात्काळ वगळण्याची मागणी केली आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 678/2025 अंतर्गत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकाश आण्णा चित्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाला राजकीय वास असून, हे संपूर्ण प्रकरण एका नियोजित राजकीय षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, संबंधित महिलेसोबत प्रकाश अण्णा चित्ते यांची कोणतीही ओळख नाही. त्या महिलेबाबत…

Read More

१२ गुन्हे दाखल असल्याने आरोपीला तडीपार करण्याचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : बदलापूर पश्चिम येथील दर्गा मोहल्ला परिसरात दिनांक ९ जून २०२५ रोजी, पोलिसांनी धाड टाकून ५१० किलो गोमांस आणि एक जिवंत वासरू जप्त केले. या ठिकाणी अनधिकृतपणे जनावरांची कत्तल होत असल्याचे निदर्शनास आले असून, याप्रकरणी कैफ नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीविरोधात यापूर्वी अशाच स्वरूपाचे १२ गुन्हे दाखल असून, सदर आरोपी सध्या अटकेत आहे. या गुन्ह्याबाबत कायद्यात पाच वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे. आगामी अधिवेशना पर्यंत ह्या कायद्यात उचित सुधारणा करून जे सराईत गुन्हेगार असतील त्यांना १० वर्षांची शिक्षा व दंडाची कारवाई होईल अशी तरतूद…

Read More

मुंबई – राज्यातील दुष्काळी भागाला पाणी पोहचवण्याचा दृष्टीने नदीजोड प्रकल्प महत्त्वाचा असून हा प्रकल्प राज्यासाठी वरदान असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत २६० च्या प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले. राज्यात अनेक नदीजोड प्रकल्प सुरू असून वैनगंगा – नळगंगा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यासोबतच नार पार गिरणा, कोकणातील सावित्री, गोदावरीचे कोकण खोरे, उल्हास, वैतरणा तसेच तापी खोऱ्यातही अनेक प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. अतिरिक्त पाणी असलेल्या खोऱ्यातून कमी तसेच पाणी नसलेल्या नदी खोऱ्यात पाणी पोहचवण्याची शासनाची भूमिका असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. यासोबतच राज्यात अनेक सिंचन प्रकल्प आहेत. अपूर्ण असणारे सिंचन प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी…

Read More

संगमनेर : मैत्रेय कंपनीकडून झालेल्या फसवणुकी बाबत आमदार अमोल खताळ यांनी गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा मिळण्या बाबत राज्यशासनाचे तारांकित प्रश्नाद्वारे मागणी करत विधीमंडळाचे यामहत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले त्यावर राज्य शासना च्या वतीने या संबंधीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून पुढील ८ ते ९ महिन्यात मैत्रेय कंपनीच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या सर्वच गुंतवणूक दारांचे पैसे मिळायला सुरुवात होईल ,अशी माहिती राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मैत्रेय कंपनीचा अडीच हजार कोटी रुपयांचा घोटाळा असून ३ हजार कोटी रुपयांची कंपनीची मालमत्ता आहे. त्यात राज्यात दीड ते दोनहजार कोटी रुपयाची तसेच गुजरात व राजस्थानमध्ये १ कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. मैत्रेय कंपनीकडून अनेकांची फसवणूक…

Read More