विरोधकांच्या गोलमोल भूमिकेमुळे सभासदांची निराशा नगर (प्रतिनिधी) – दर वर्षी गोंधळ आणि गदारोळामुळे चर्चेत असणारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा काल शांततेत संपन्न झाली . सत्ताधारी गटापेक्षा विरोधकांनी गोलमोल भूमिका घेतल्याने या सभेमध्ये मागील वेळेप्रमाणे फारशी वादावादी झाली नाही .उलट विरोधी गटातील सदस्यांची भाषणे सत्ताधाऱ्यांना पूरक अशी झाल्याने विरोधक मॅनेज झाल्याचा आरोप काही सभासदांनी केला. काल सकाळी अकरा वाजता सभेला सुरुवात झाली सभेचे अध्यक्ष विद्यमान चेअरमन बाळासाहेब तापकीर यांनी प्रास्ताविक भाषणात अहवालातील नमूद बाबींवर प्रकाश टाकला जिल्हयाच्या नावात बदल झाल्याने बँकेच्या नावात बदल करणे बँकेचे कार्यक्षेत्र राज्य भर करणे शेड्युल बँक करणे स्वीकृत संचालक पदी सर्व…
Author: dainiksnehprakash
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही श्रीरामपूर (प्रतिनिधी )- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या श्रीरामपूर येथील पूर्णाकृती पुतळ्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याचे भाजपचे श्रीरामपूर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे यांनी सांगितले. पालकमंत्री विखे यांनी श्रीरामपूर नगरपालिकेत नुकतीच आढावा घेतली. यावेळी साळवे यांनी श्रीरामपूरच्या विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी महाराष्ट्र सरकारने दिल्याबद्दल तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे काम सुरू झाल्याबद्दल पालकमंत्री विखे पाटील यांचे अभिनंदन करून महामानव डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबतच्या अडचणी दूर करून तातडीने पुतळ्याचे काम सुरू करण्याची मागणी पालकमंत्री विखे यांच्याकडे केली.…
उद्योजक, कर्मचारी आणि नागरिकांनी संकलित केल्या 428 बॅग संगमनेर (प्रतिनिधी) – रक्तदानासारख्या पवित्र आणि जीवनदायी कार्यात संगमनेर तालुक्याने पुन्हा एकदा एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. TLC संगमनेर (टिचिंग लर्निंग कम्युनिटी) या संस्थेच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल 428 बॅगांचे संकलन होऊन एक नवा इतिहास रचण्यात आला. या उपक्रमाचे घोषवाक्य ठरले – “अबकी बार… 400 पार!” आणि संगमनेरकरांनी ते साकार करत रक्तदातृत्वाचे उज्ज्वल उदाहरण घडवले. रक्तदान म्हणजे केवळ रक्त देणे नव्हे, तर ते कोणाच्यातरी जीवनाची आशा बनवणे असते. अॅनेमिया, थॅलेसेमिया, अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी लागणारे रक्त, डेंग्यूसारख्या आजारांतील प्लेटलेट्स यासाठी हे रक्त अत्यंत मौल्यवान ठरते. रक्त हे प्रयोगशाळेत न बनणारे…
अँकर्स असोसिएशन तर्फे भूमिपुत्रांचा गौरव श्रीरामपूर – फुलांचा हार नजरेला मनमोहक दिसतो मात्र फक्त फुले असून उपयोग नाही तर त्यांना एकत्रित गुंफणारा दोरा महत्त्वाचा असतो अगदी याचप्रमाणे एखादा कार्यक्रम समारंभ बहारदार करण्यात सूत्रसंचालकाचा वाटा मोठा असून सूत्रसंचालक म्हणजे शब्द फुलांच्या माध्यमातून कार्यक्रम सुंदरपणे गुंफणारा अलवार धागा असल्याचे प्रतिपादन येथील रा.ब. नारायण राव बोरावके महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक व व्याख्याते प्रा. लक्ष्मण कोल्हे यांनी केले आहे. येथील अँकर असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘गौरव भूमिपुत्राचा” या मालिकेतील पाचव्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. मंचावर आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, कवियत्री संगीता फासाटे ,पत्रकार मिनाक्षी राजेंद्र देसाई, संदेशदूत राजेंद्र करंकाय ,योगा खेळाडू अथर्व कोरडे यांचे वडील…
डॉ. सुजय विखे पाटील यांनी कुबेरेश्वर धाम येथे घेतली प्रदीप मिश्रा महाराजांची भेट शिर्डी | प्रतिनिधी शिर्डी येथे येत्या १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या भव्य दिव्य आशा अध्यात्मिक कार्यक्रमात मार्गदर्शन स्वतः परमपूज्य प्रदीपजी मिश्रा महाराज करण्यार असल्याचे डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मध्यप्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम येथे जाऊन महाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शिर्डी येथे येण्याचे सादर आमंत्रण दिले असून येत्या १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान भव्य शिवपुराण कथा महोत्सवाचे होणार आहे. शिवकथा महोत्सवाची संपूर्ण आयोजनाची जबाबदारी विखे पाटील कुटुंब घेणार असून,या…
श्रीरामपूर : शेजारील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी श्रीरामपूर बाजार समितीने उपबाजार मार्केट निर्मिती करून बाजार समितीचा विस्तार करावा. चांगले काम करत असताना अडचणी येत असतात त्याला तोंड देत पुढे जात राहावे. आता तर तुमच्याकडे विरोधकच नसल्यामुळे आता चांगले निर्णय घेता येतील. मार्केट कमिटीने जनावरांचा बाजार, फुल मार्केट सुरू करून बाजार समितीने नावलौकिक मिळवावा, असे आवाहन आ. हेमंत ओगले यांनी केले. श्रीरामपूर बाजार समितीच्या 21व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी सभापती सुधीर नवले होते यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, मुळा प्रवराचे माजी संचालक सिद्धार्थ मुरकुटे, बाजार समिती संचालक सचिन गुजर, राजेंद्र पाऊलबुद्धे, राजू चक्रनारायण, दशरथ…
विखे पाटील महाविद्यालय महिला सक्षमीकरण कार्यशाळा लोणी (प्रतिनिधी) : मुलींनो शिक्षणातून पुढे जातांना खूप मोठे व्हा परंतु आई-वडिलांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका प्रवरेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाबरोबरच मुलींना सक्षम करण्यात प्रवरा ही कायमच अव्वल स्थानावर राहिले आहे. महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू आहे या उपक्रमातून महिलांनी सक्षम व्हावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या प्रवरानगर येथील पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय महिला सक्षमीकरण कक्ष अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यामाने आयोजित…
संगमनेर (प्रतिनिधी) : संगमनेर तालुक्याच्या पठार भागा तील वीजेच्या प्रश्नांसाठी आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला . तसेच शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने वीज पुरवठा मिळण्यासाठी आ. खताळ यांच्या माध्यमातून साकूर विज उपकेंद्रामध्ये १० एम व्ही ए चे दोन ट्रान्स फॉर्मर बसविण्यात आल्याने पठार भागा तील विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच पठारभागातील प्रत्येक गाव, वाडीवस्तीवरील विजपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सबप्टेशनमधे ५ एम व्ही ए चे चार ट्रान्स फॉर्मर असल्याने विद्युत पुरवठा कमी पडत होता. मात्र विद्युत पुरवठा कमी पडत असल्याने शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने वीजपुरवठा मिळत नसल्यानेशेतीपिकांचे नुकसान…
गुरूवर्य गंगागिरीजी महाराजांच्या १७८ व्या हरीनाम सप्ताहाचे शनिदेवगाव येथे ध्वजारोहण लोणी (प्रतिनिधी) : सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा सनातन हिंदू धर्म संस्कृती आणि परंपरेच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण आहे. या अध्यात्माच्या अधिष्ठानामागे समाजाने उभ्या केलेल्या शक्तीमध्येच सप्ताहाचे यश असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. गुरूवर्य गंगागिरीजी महाराजांच्या १७८ व्या हरीनाम सप्ताहाचे आयोजन वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव येथे करण्यात आले आहे.सप्ताहाचे ध्वजारोहण महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी खा.संदिपान भुमरे,आ.रमेश बोरनारे सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष महंत हरीशरण गिरीजी महाराज माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर भानूदास मुरकुटे भाऊसाहेब कांबळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर प्रभाकर शिंदे दिपक पठारे अविनाश गलांडे यांच्यासह…
श्रीरामपूर नगरपरिषद, प्रेस क्लब, वसुंधरा वृक्ष संवर्धन समितीचा उपक्रम श्रीरामपूर : झाडे लावणे सोपे असते, पण त्याची व्यवस्थित निगा राखणे, हे काम अवघड असते. श्रीरामपूरातील वसुंधरा वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करत असतात. श्रीरामपूर नगर परिषद, प्रेस क्लब (श्रीरामपूर) व वसुंधरा वृक्षसंवर्धन समितीच्या वतीने पत्रकार भवन परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, मनोज आगे, नगर पालिकेचे अभियंता ॲड प्रमोद चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप आहेर, राजेंद्र बोरसे, मधुकर माळवे, स्वामीराज कुलथे, बद्री वढणे, राजेंद्र दळवी, संतोष…