जिल्ह्याच्या शेवटचे टोक असणाऱ्या एका तालुक्यात हजारो कोटींचा विकास निधी आला अशा गप्पा गेले अनेक वर्षे रंगल्या. त्यावर दुसरी विधानसभा देखील झाली आणि पुन्हा जनतेच्या नशिबी हाल अपेष्टा आणि दयनीय कारभाराची परिस्थती आली. भ्रष्ट्राचार,निकृष्ट कामे,टक्केवारी,माफियागिरी,अवैध धंदे यांना तेजी आली पण सामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणून होण्याची गती खुंटली.विकास झाला पण कुणाचा तर मस्तवाल राजाच्या लुटारू सेवकाचा अशी खमंग चर्चा जोर धरू लागली आहे.
साधा एक सेवक या मायाजाळाचे अडीच तीन कोटींचा बंगला अल्पावधीच बांधतो.त्याचे अनेक सुरिले किस्से जगजाहीर असताना राजा मात्र डोळ्यावर जबरी पट्टी लावून घेतो.अर्थात राजाच मूकसंमती देणारा त्यामुळेच हे घडते अशी खात्रीच त्यांच्याच अनेक प्रधानांना झाली आहे.गरिबांच्या रेशनपासून ते पाण्याच्या तळ्यात भ्रष्टाचाराचा गाळ करून या बहादराने उखळ पांढर केल्यावर सगळीकडून ओरड झाली पण त्याचा बाल बाका झाला नाही कारण त्याचा आका यासाठी पाठशी होता.
आ.का चा अरुणोदय लुटण्याच्या छायेत पडला.राजमहाल आणि प्रति राजमहाल यांच्या छब्या पाहूनच तोंडांत बोट जाणारे सामान्य नागरिक आता या विषयावर प्रकाश टाकू लागले आहे. घर बांधणे गुन्हा नाही पण गुन्हेगारांच्या मांडवल्या करून त्यातून माया घेणे,अधिकाऱ्यांना महिन्याला हफ्ता राजाला पोहोच करण्यास सांगुन त्यात सेवकाचा वाटा वेगळाच,गरिबांच्या धान्यातून लूट करणे, तुफान प्रमाणात गैरव्यवहार करणे,टक्केवारी खाणे यातून आपलेच घर भरून जनतेचे हाल करणारा हा गुन्हेगारच असतो. स्नेहप्रकाश इम्पॅक्ट अंतर्गत आम्ही असे अनेक प्रकरणे तुमच्या समोर रोज घेऊन येणार आहोत हा राजा आणि सेवक कोण आहे हे आपल्या लक्षात येणारच आहे.

