बेलापूरः महिलांनी सक्षम व आत्मनिर्भर बनून स्वावलंबी बनावे यासाठी जलसंपदा तथा पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बेलापूर बु ग्रामपंचायत माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत.तसेच महिलांसाठीच्या विविध शासकिय योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत.यामुळे बेलापूर-ऐनतपूर गावातील महिलांमध्ये आर्थिक ,सामाजिक तसेच सर्वकष परिवर्तन होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केले. बेलापूर बुll ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यास संबोधित करताना श्री.नवले बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच मिनाताई साळवी होत्या.मेळाव्यास बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे,उपसरपंच चंद्रकांत नवले,ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक शेख,तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,रंजना बोरुडे,प्रतिभा नवले, मानवी खंडागळे, जया भराटे,आशा गायकवाड,ज्योती जगताप,मंगल जावरे,सरिता मोकाशी ,वैशाली शेळके,मनीषा दळे,संगीता शिंदे ,संध्या तेलोरे,नीलिमा कुमावत ,सुजाता गुंजाळ,वैशाली शिरसाठ,सुवर्णा खंडागळे,पंचायत समितीच्या प्रकल्प अधिकारी शोभा शिंदे,बँक आॕफ महाराष्ट्र चे शाखा व्यवस्थापक राजेश परदेशी, डॉ. अश्विनी लिपटे, शशिकांत दुशिंग यांचेसह पञकार उपस्थित होते. श्री.नवले म्हणाले की,बेलापूर-ऐनतपूर गावात विविध जाती धर्माचे लोक राहातात.यात महिलांची संख्या पन्नास टक्के इतकी आहे.या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांचे नेतृत्वाखाली तसेच माजी खा.डाॕ.सुजय विखे पा.,जि.परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताईविखे पा.यांचे सहकार्याने ग्रामपंचायत माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत.गेली तिन वर्षे बेलापूर ग्रामपंचायतीची माजी सरपंच स्वाती अमोलिक,मिनाताई साळवी,माजी उपसरपंच तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,सदस्य उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,शिलाताई पोळ,छायाताई निंबाळकर या महिलांनी समर्थपणे सांभाळून महिलाही सक्षमपणे कारभार करु शकतात हे दाखवून दिले आहे.गावकरी मंडळाने सर्व समाज घटकांना न्याय देण्याची शब्दपूर्ती केली.लवकरच १००० घरकुलांचे बांधकाम सुरू होणारा आहे.महिलांना शासकीय योजनांची माहिती झाल्यास त्यांना या योजनांचा योग्य लाभ घेता येवू शकेल.महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर कुटुंबाचेही आरोग्य चांगले राहू शकते.यादृष्टिने महिलांना शासकीय योजनांची माहिती व्हावी तसेच त्यांनी आरोग्याबाबात सजग व्हावे यासाठी आरोग्य प्रबोधन व तपासणी या हेतुने मेळाव्याचे आयोजन केल्याचे श्री.नवले यांनी सांगीतले . प्रास्तविक भाषणात बाजार समितीचे माजी उपसभापती म्हणाले की,आजवर बेलापूर ग्रामपंचातीच्या माध्यमातून बेलापूर-ऐनतपूर गावाच्या विकासासाठी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांचे इतके भक्कम सहाय्य व पाठबळ कोणीही केले नाही.नाम.विखे यांच्या सहकार्याने १२६ कोटीची पाणी पुरवठा योजना तसेच या योजनेच्या साठवण तलावासाठी आठ एकर जमिन ग्रामपंचायतीला मोफत मिळाली.या योजनेचे काम प्रगतीपथावर असून येत्या सहा महिन्यात योजना पूर्ण होईल.गावातील गरजूंसाठी तब्बल ११०० घरकुले मंजूर झाली आहेत. या घरकुल वसाहतीसह,सेंद्रिय खत प्रकल्प,क्रिडा संकुल तसेच सर्वधर्मियांच्या स्मशानभुमिसाठी ३४ एकर जागा नाम.विखे पा. यांच्या प्रयत्नातून मिळाली आहे.ग्रामपंचायतीने भुयारी गटारीचे काम मोठ्याप्रमाणावर केले आहे.तसेच ओला व सुका कचरा स्वतंञपणे संकलित करण्याचे कामही सुरु केले आहे.भविष्यात कच-यावर प्रक्रिया करुन खतप्रकल्प उभारणी केली जाणार आहे.सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर आहे.पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी रस्ते खोदाई झाल्याने रस्त्यांची कामे करता आली नाहीत.माञ पावसाळ्यानंतर लगेचच रस्त्यांची कामे केली जातील. त्यासाठी निधी उपलब्धतेसाठी नाम.विखे पा.यांचे माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. लवकरच पाणीपुरवठा योजना कामाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती श्री.खंडागळे यांनी दिली. यावेळी सरपंच मिनाताई साळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करुन मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला तर सौ.आशाताई गायकवाड ,ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प.समितीच्या प्रकल्प आधिकारी शोभा शिंदे यांनी बचतगटा संदर्भातील योजना,त्या माध्यमातून करता येणारे व्यवसाय याची माहिती दिली. महाराष्ट्र बँकेचे बेलापूर शाखेचे व्यवस्थापक राजेश परदेशी यांनी महिलांसाठी बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देवून त्याबाबात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रारंभ प्रकल्पचे शशिकांत दुशिंग यांनी घनकचरा व ओलाकचरा संकलन व प्रक्रियाबाबत सविस्तर माहिती दिली.प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या आरोग्य अधिकारी डाॕ.अश्विनी लिप्टे यांनी महिलांच्या आरोग्याबाबत प्रबोधन केले.पञकार देविदास देसाई यांनी अंधश्रध्देबाबत प्रबोधन केले.मेळाव्याचे दरम्यान महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.अध्यक्षीय सूचना सौ. मनिषा दळे यांनी मांडली त्यास सौ. संध्या तेलोरे यांनी अनुमोदन दिले.कार्यक्रमाचे सूञसंचलन सौ.योगिताताई अमोलिक यांनी केले तर सौ. वैशालीताई शेळके यांनी आभार मानले.मेळाव्यास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

