शिर्डी (प्रतिनिधी) : साईश हाॅटेल ते साई गणेश गॅस एजन्सी दरम्यान असलेला पिंपळवाडी रोड रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे संदरचा रस्ता पुणतांबा सरालाबेट शनि शिंगणापूर नेवासा श्रीरामपूर या सारख्या गावांना जाण्यासाठी जवळचा रस्ता आहे हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे
त्रस्त स्थानिक नागरिकांनी डॉ सुजय विखे यांचे याकडे लक्ष वेधले असता तात्काळ त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतिश दिघे यांना फोन करून दोन दिवसांत बैठक घेऊन तक्रारदारांचा प्रश्न मार्गी लावा असा आदेश दिला नागरिकांना हा रस्ता खराब व रूंदीकरण न झाल्याने यापूर्वी अनेक लहान मोठे अपघात झाले होते त्यात काही जणांचा मृत्यू देखील झाला होता तर काहीजण जखमी देखील झाले होते काही लोकांनी हा रस्ता त्वरित झाला पाहिजे यासाठी वेळोवेळी शिर्डी नगरपरिषद कडे देखील पाठपुरावा केलेला होता मात्र यश आले नव्हते त्यामुळे नगरपरिषदेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर नाराजीची भावना निर्माण झाली होती ग्रामस्थांच्या समश्या तात्काळ मार्गी लावा व सहमतीच्या माध्यमातून मार्ग निघत नसेल तर वेळप्रसंगी कायदेशीर मार्गाने जाऊन ह्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कठोर भूमिका घेऊन पुढे जा असा आदेश दिला आहे या रस्त्याच्या बाबतीत डॉ सुजय विखे यांनी लक्ष घातल्याने सामाजिक कार्यकर्ते अशोक गायके समाधान व्यक्त केले आहे

