श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील मध्यवस्तीत मेनरोडवर असलेल्या सराफी दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 30 किलो चांदी व 4 ग्राम सोने असे 38 लाखाच्या दागिन्यांची चोरी केली तर इंदिरानगर परिसरात असलेल्या आणखी एक सराफी दुकान फोडून सुमारे 70 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
श्रीरामपूर शहरातील मध्यवस्तीत हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनच्या जवळील मेनरोडवर असलेले निखिल विजय नागरे यांच्या मालकीचे रामभाऊ सोपान नागरे या सराफी दुकान काल मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील अंदाजे 30 किलो चांदी व 4 ग्राम सोने चोरून नेले. सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही लोकांच्या कुलूप तोडल्याचे लक्षात आले. त्यानी तातडीने दुकान मालकांना फोन करून याबाबतची माहिती दिली. दुकान मालक निखिल विजय नागरे व विजय नागरे हे तातडीने दुकानात आले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुकानाची पाहणी करून पंचनामा केला. एलसीबीचे पोलिस पथकही श्वान पथक घेऊन दाखल झाले. या दुकानातून नक्की किती दागिने गेले याबाबतची शहानिशा काल रात्रीपर्यंत सुरू होती. चोरट्यांमी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या ठिकाणी कळ्या रंगाचे कपडा लावले होते. परंतु समोरील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पहिले असता एक कळ्या रांची चार चाकी गाडी तेथे होती व चोरी झाल्यानंतर ती तेथून निघून गेली. त्यात गाडीचा नंबर दिसत नसल्यामुळे पोलिसांना तपासात अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
इंदिरानगर येथील दत्त मंदिरासमोर असलेल्या आकाश मैड या सोनाराच्या दुकानात शुक्रवारी पहाटे ४.१५ वाजेदरम्यान चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील असलेले काही चांदीचे दागिने व चार ग्राम सोन्याचे दागिने असा मिळून रु ७० हजार रुपयाच्या दागिन्यांची चोरी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व सहकारी पोलीस कॉन्स्टेबल श्री. परदेशी, श्री. शेलार, श्री. खरात, व एलसीबी पथक रमेश राजा आदी घटनास्थळी आले. त्याचप्रमाणे घटनास्थळी श्वानपथक येथे आले होते. पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्याचप्रमाणे एका सीसीटीव्ही मध्ये चोरटे कैद झाले आहेत त्यामुळे लवकरच चोरटे पोलिसांच्या हाती लागतील असा अंदाज आहे.
